कुंभ मेळावा; समाजाला दिशा देणारा—श्याम चैतन्यजी महाराज

Spread the love

सोयगाव, दि.१९.(साईदास पवार)..कुंभाच्या माध्यमातून सर्व समाजाला एक दिशा मिळेल त्यासाठीच दहा घटक राज्ये या गोद्री ता जामनेर येथील कुंभात सहभागी होत आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाचे संचलन समितीचे अध्यक्ष श्याम चैतन्य महाराज यांनी गुरुवारी रात्री आठ वाजता जरंडी येथे केले

जामनेर तालुक्यातील गोद्री येथे दि.२५ ते ३० जानेवारी दरम्यान अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ होत आहे या कुंभाचे आयोजक महाराष्ट्र राज्य असून या कुंभात देशातील दहा घटक राज्ये सहभागी होत आहे कुंभ हा राजकीय नसून सामाजिक परिवर्तन ची नांदी असल्याचे त्यांनी सांगितलं यावेली त्यांनी बंजारा समाजाच्या मागे एक मोठा इतिहास असल्याचे सांगून समाज एकत्रिकरण यासाठी हा कुंभ असल्याचे सांगून या कुंभातून समाजाला दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करून जास्तीत जास्त संख्येने कुंभा मध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी सेवा करा असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले यावेळी संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले निलेज चव्हाण दीपक चव्हाण भरत चव्हाण रघुनाथ राठोड विश्वनाथ चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान अमृत राठोड भिवा चव्हाण शिवदास चव्हाण सुरेश राठोड भाईदास पवार साईदास पवार लोकेश पाटील रवींद्र पाटील समाधान चौधरी भगवान चौधरी किरण माळी वासुदेव चौधरी सुशांत पाटील अनिल माळी आदींनी पुढाकार घेतला
—कुंभाचे निमंत्रण देण्यासाठी आलोय
यावेळी कुंभ संचालन समितीचे श्याम चैतन्य महाराज यांनी गाव वासीयांना अखिल भारतीय हिंदूगोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ साठी निमंत्रण देण्यासाठी आलोय असे त्यांनी सांगून त्यांनी सर्वांनी कुंभा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले…..

टीम झुंजार