प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल: येथे सालाबादाप्रमाणे जय श्रीराम प्रतिष्ठान तर्फे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम श्रीराम चौक बुधवार दरवाजा परिसर येथे २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे मास्क वाटप करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुचिता चव्हाण या होत्या. त्यांनी आपल्या मनाला महिलांनी व मुलींनी स्वावलंबी बनावे. व कर्तुत्ववान बनावे तर उपनगराध्यक्ष छायाताई दाभाडे , डॉ. स्नेहल पाटील , प्रा. डॉ. स्वाती पाटील, सुरेखा पाटील डॉ. आसावरी पाटील, यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला आरोग्य, मानसिकता बदलण्याची गरज, विषयी सखोल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात एरंडोल ग्रामीण रुग्णालयातील महिला परिचारिका, नर्स यांनी कोरोना काळात अहोरात्र उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन त महिला कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान सदर कार्यक्रमात नगरपालिकेचे प्रशासन विकास नावळे यांचा स्वच्छ शहर, सुंदर शहर व स्वच्छता, वृक्षारोपण व वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबत उल्लेखनीय कामगिरी याबद्दल प्रतिष्ठान तर्फे त्यांचा नागरिक जाहीर सत्कार करण्यात आला.
न.पा. प्रशासक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की हा सत्कार माझा नसून संपूर्ण नगरपालिकेचा व सर्व सफाई कामगारांचा आहे. व शहरातील नागरिकांचा सकारात्मक सात असल्यामुळे कामे होत आहेत.
मान्यवरांचे स्वागत प्राचीता पाटील, सूत्रसंचालन चानाक्षी जाधव, आभार मेघा पाटील यांनी केले सदर कार्यक्रमासाठी शहरातील सर्व माजी नगरसेविका हर्षाली महाजन ,कल्पना महाजन,शोभा पाटील, यांच्यासह परिसरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गोपाल शामू पाटील, गोरख महाजन , मधुकर महाजन ,बाबूलाल महाजन, सदानंद पाटील, जंगलु पाटील, गोकुळ शंकर महाजन, नथू लोहार, शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील. सुनील चौधरी, सुनील पाटील
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा.नितीन पाटील उपाध्यक्ष अमर महाजन सचिव प्रदीप फराटे, खजिनदार डॉ.सुमेघ महाजन, ऋषिकेश महाजन, अमित पाटील, आबा महाजन, कृष्णा पाटील, दिनेश पाटील, ओम पाटील, प्रशांत लोहार, पुष्पक पाटील, संजय महाजन, महेश पाटील, गणेश पाटील, देव जाधव, सागर शिंपी , टोनी शिरवाणी, बंटी शिरवाणी, व जय श्रीराम प्रतिष्ठान च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.