निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी प्रवीण काशिनाथ पाटील,वय 40 हे आज सकाळी 9वा 30 मिनिटाच्या सुमारास बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरून बैलगाडीने शेतात जात असतांना रावेर कडून भरधाव वेगाने येणाऱ्या MP.04 CP.6380 या क्रमांकाच्या होंडा एक्सेंट कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने बैलगाडी ला मागुन जोरदार धडक दिल्याने शेतकरी प्रवीण काशिनाथ पाटील हे रस्त्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाले आहे.तसेच सदर बैलगाडी कारच्या धडकेने दामू पाटील यांच्या शेतात फेकली गेल्याने एका बैलाचे शिंग देखील तुटले आहे.तसेच अपघात घडले बाबत वडगाव येथील पोलिस पाटील संजय वाघोदे यांनी निंभोरा पोलिसांना भ्रमणध्वनी द्वारे माहिती देण्यात आली होती.
घटना स्थळी निंभोरा पोलीस स्टे चे एपीआय गणेश धुमाळ यांनीआपल्या ताफ्यासह दाखल झाले असता सदरील घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करणेसाठी पाठविण्यात आला आहे.या बाबत निंभोरा पोलीस स्टेशनला वडगाव येथील मयताचे नातेवाईक धनराज पाटील यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे कारचालका विरोधात भादंवि कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास निंभोरा पोलीस स्टे चे स.पो.नि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय काशिनाथ कोळंबे हे करीत आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






