एरंडोल :- दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी दादासाहेब दि.शं. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी युवती सभा मंचातर्फे आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत एरंडोल पुलिस स्टेशनला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांना पुलिस स्टेशन चा कामकाजाची माहिती मिळावी, पुलिस स्टेशन विषय मुलींच्या मनातील भीती दूर व्हावी, तक्रार नोंदलतांना कोणती खबरदारी घ्यावी, पुलिस विभाग सर्वसामान्य जनतेचा संरक्षणी साठी कोण कोणतेकार्य करते याची माहिती मिळावी या उद्देशाने या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी मुलिंच्या मनामध्ये असलेल्या शंकांचे निरसन केले. तसेच त्यांना मिळालेले स्टार कशासाठी आहे याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन केले. महिला अटक करण्यासाठी कौण -कौणते नियम व कायदे आहे याविशेषयीची विद्यार्थिनीनी माहिती करूंन घेतली. विद्यार्थीनिनी अमंलदार कक्ष, बिनतारी संदेश कक्ष, गुन्हे अन्वेषण कक्षा , संगणक कक्ष, पुरुष कस्टडी, महिला कस्टडी, मु्द्देमल कक्ष या वेगवेगळ्या विभागाची माहिती करुन घेताली. यह वही मनोज कुमावत, संदीप पाटिल यांनी विद्यार्थिनीना संपूर्ण विभागाची सविस्तर माहिती दिली.
पुलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उप निरीक्षक शरद बागल, काशीनाथ पाटिल, राजेश पाटिल, अनिल पाटिल,संदीप पाटील,पंकज पाटील यानी अनमोल सहकारी केले. या क्षेत्रभेटीचा लाभ महाविद्यालयातील 90 विद्यार्थिनिंनी घेतला. या क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ हेमंत पाटिल, युवती सभा सचिव डॉ स्वाति शेलार युवती सभा सदस्य डॉ मीना काळे,डॉ. रेखा साळुंखे, डॉ. शर्मिला गाडगे, डॉ सविता पाटिल प्राध्यापिका मनीषा बाविस्कर यानी विशेष परिश्रम घेतले.






