जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
कामाचा आनंद घ्यावा. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. स्वभावात चंचलता येईल. लहानांशी मैत्री कराल.
वृषभ :-
पचनाच्या तक्रारी राहतील. विचारातून कर्मठपणा दर्शवाल. वडीलांचे मत विरोधी वाटू शकते. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करता येईल. जुन्या गोष्टीत अडकून पडाल.
मिथुन :-
प्रकृतीच्या बाबत हयगय करू नका. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. कामाचे योग्य नियोजन करावे. घरातील कामात अधिक गुंतून राहाल.
कर्क :-
जवळच्या प्रवासाची मजा घ्याल. जवळचे मित्र जमवाल. आपल्या छंदाला अधिक वेळ द्यावा. शांतपणे विचार करावा. आधुनिकतेने विचार करून पहावा.
सिंह :-
गैरसमजुतीतून वाद वाढू शकतात. काही गोष्टी दिरंगाईने पार पडतील. पायाचे त्रास दुर्लक्षित करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो. मानसिक शांतता जपावी लागेल.
कन्या :-
आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करावा. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा. दिवस आनंदात घालवाल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. घरातील प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.
तूळ :-
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. कष्टाला मागेपुढे पाहू नका. चिकाटीने कामे करण्यावर भर द्यावा. योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. फार विचार करू नयेत.
वृश्चिक :-
काही गोष्टींचे चिंतन करावे. धैर्याने कामे हाती घ्यावीत. तुमच्या पराक्रमाला चांगला वाव मिळेल. चटकन निराश होऊ नका. काही गोष्टींचा सखोल विचार करावा.
धनू :-
स्थावरची कामे मार्गी लागतील. चिकाटीने अनेक कामे हाती घ्याल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. कंजूषपणा दाखवू नका. अगदी मोजकेच बोलाल.
मकर :-
प्रौढपणे वागणे ठेवाल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. अडथळ्यातून मार्ग निघेल. सर्वांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमचा मान वाढेल.
कुंभ :-
मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काही मापदंड ठरवून घ्यावेत. आलेल्या संधीचा लाभ उठवावा. गप्पा मारण्यात रंगून जाल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.
मीन :-
सामाजिक कामात हिरीरीने सहभाग नोंदवाल. मानाने कामे हाती घ्याल. काहीसे स्वच्छंदीपणे वागाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. जोडीदाराचा प्रेमळपणा दिसून येईल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






