अमळनेर :- सध्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण हे वाढत चाललं आहे. अश्यातच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरुळ गावात एका २३ वर्षीय तरुणाची ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
क्रेडीट कार्डच्या ऑफर तसेच पर्सनल लोनच्या बहाण्याने अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील एका तरुणाची ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ओटीपी सांगितल्यावर फोनवर बोलता बोलताच तरुणाचे बँक खाते काही मिनिटात रिकामे झाल्याचा प्रकार घडला आहे.
अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील मूळ रहिवासी मिलिंद प्रकाश पाटील (वय २३) हा तरुण सद्यस्थितीत पुण्यातील हिंजवडी येथे वास्तव्यास आहे. मिलिंद यास त्याच्या मोबाईलवर १८ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवर बोलणाऱ्या संबंधित व्यक्तीने मिलिंद यास पर्सनल लोन तसेच क्रेडीट कार्डच्या वेगवेगळया ऑफरबद्दल माहिती देत मिलिंद याचा विश्वास संपादन केला.
यादरम्यानच त्याला ओटीपी पाठवून तो विचारला. मिलिंद याने ओटीपी सांगितल्यावर या ओटीपीच्या आधारावर संबंधितांनी मिलिंद याच्या बँक खात्यातील तब्बल ७ लाख ६० एवढी रक्कम दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्स्फर करुन घेतली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर मिलिंद पाटील याने शुक्रवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






