कोरेगाव भीमा येथे “विजय स्तंभाला”मानवंदना देण्यासाठी २० लाखांपेक्षा जास्त अनुयायी यांच्या सोबत झालेल्या गैरसोय बद्दल तीव्र संताप..!
जळगाव – प्रतिनिधी
जळगाव :- १ जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव भीमा येथे “विजय स्तंभाला”मानवंदना देण्यासाठी २० लाखांपेक्षा जास्त अनुयायी आले होते.महाराष्ट्र शासन व त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत असताना बहुजन समाजाशी जो गैरव्यवहार व गैरसोय केली त्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले .बहुजन समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासन व त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जनतेच्या न्यायालयात खालील प्रमाणे आरोप ठेवण्यात आले..
१) इंटरनेट सेवा खंडित करण्यामागे महाराष्ट्र शासनाचा हेतु काय?
२) कोरेगाव भीमाच्या युध्द एका जातीने पेशव्यांच्या बरोबर केलेले होते काय?
३) वाहतुक व्यवस्था विस्कळीत करुन मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायांना मानसिक व शारीरिक त्रास देण्याचे महाराष्ट्र शासनाचे कारस्थान .
४)बस व्यवस्था, पिण्याचे पाणी, टॉयलेट,व आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन न दिल्यामुळे लहान बालके,महिला व वृध्दांचे अतोनात हाल झाले.
भेदभाव करणाऱ्या व समान संधी नाकारणा-या महाराष्ट्र शासन व प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले असे निवेदन देण्यात आले.
प्रसंगी , मोहन शिंदे, विजय सुरवाडे ,नितीन गाढे, देवानंद निकम,सुनिल देहडे,सूकलाल पेंढारकर व कुंदन तायडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात ,सुमित्र अहिरे,राजेंद्र खरे हाजी जाकीर कुरेशी,डॉ.शाकीर शेख,खुमानसिंग बारेला,ईरफान शेख,शेरखान,सुरेश तायडे,विनोद अडकमोल, जगदीश सपकाळे, बाविस्कर साहेब,योगेश सोनवणे,नंदलाल आगारे ,अफजल तडवी,प्रज्ञुम्न वारडे,मयुर तायडे,आदेश लोंढे,भगवान कांबळे,संजय कदम,रविंद्र गायकवाड,आर्यन भालेराव,सुर्यभान तायडे, दिपाली पेंढारकर,संगिता देहडे,किरणताई निकम, सुर्यभान सपकाळे,जय मोरे, रविंद्र सोनवणे,सम्राट तायडे,खुशाल सोनवणे,नागराज ढिवरे,मयुर पाटील, सिध्दार्थ सैंदाणे,नरेंद्र सोनवणे,शांताराम तायडे,प्रदिप सुरवाडे,प्रदिप गणपत सुरवाडे,भास्कर पवार,कडु हेरोळे,सम्राट जहांगीर तायडे,प्रकाश खांडेकर,युवराज सोनवणे,चेतन तायडे,आवेश खाटीक,शाकीर जमील,नगराज ढिवरे आदि कार्यकर्ते सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील साहेबांना मोहन शिंदे,नितीन गाढे,विजय सुरवाडे,देवानंद निकम, सुनिल देहडे, सुकलाल पेंढारकर,कुंदन तायडे , डॉ.शाकीर शेख यांनी निवेदन दिले.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.