निंभोरा बु।।ता रावेर :- येथील नंदपाल दूध उत्पादक सहकारी संस्थेची निवडणूक दि.२२ रोजी होऊन या निवडणूकिचा निकाल रात्रिच जाहिर झाला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिपक ठाकुर त्यांचे सहकारी तसेच दूध संस्थचे सचिव विलास फालक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
निवडणूक शांततेत व्हावे म्हणून निंभोरा पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनखाली हे का कोल्हे व चौधरी व पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संस्थेचे एकूण मतदान 1341इतके होते. यात दरम्यान 250 मतदार मयत आहे व 868 मतदार यांनी आपला हक्क बजवला. यात विजयी सर्वसाधारण गटात 12 जागेसाठी 20 उमेदवार रिंगणात होते. यात रमेश हरि येवले (431),प्रकाश काशीराम खाचणे(422),चंद्रशेखर हिरामण भोगे(413),संतोष भास्कर वाणी (394),वामन रामदास खाचणे(386),दत्तात्रय मुरलीधर पवार (383),मनोहर सुपडू कोळंबे(372),लीलाधर किसन बोंडे(359),सचिन कडू चौधरी (357),रविंद्र तुकाराम नेहेते (351),प्रमोद नत्थू भंगाळे(346),वासुदेव कौतिक कोळंबे(342) हे उमेदवार निवडणून आले आहे. तर ओ बी सी मतदार संघ गटातुन 1 जागे साठी दोन उमेदवार होते.
यात अमोल प्रमोद खाचणे यांना 402 मते मिळाल्याने विजयी झाले आहे. तर अनुसूचित जाति जमाती या मतदार संघ गटातील 1 जागे साठी दोन उमेदवार होते. यात शामराव भास्कर महाले यांना 439 मते मिळाल्याने विजयी झाले आहे. तर महिला मतदार संघ गटात 2 जागे साठी तीन उमेदवार होते यात सौ. गायत्री घनश्याम खाचणे (571) तर सौ. अरुणा प्रल्हाद नेमाडे (481) हे विजयी झाले आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






