कोडवर्ड नुसार सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शशिकांत पाटील यांनी केली कारवाई
प्रतिनिधी l अमळनेर
वीटभट्टीसाठी ग्रामपंचायत कडून नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात २७ हजार ५०० रुपये लागतील असे सांगून तडजोडीअंती 25 हजारांची लाच स्वीकारताना पाडळसरे येथून जवळच असलेल्या नीम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने सोमवारी दिनांक २३ च्या दुपारी निम ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाने रक्कम स्वीकारताच तक्रारदार यांनी जोरात शिंक देताच सापळा रचून बसलेल्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. राजेंद्र लक्ष्मण पाटील (55, रा.सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे, अमळनेर) असे अटकेतील ग्रामसेवक आरोपीचे नाव आहे.
म्हळसर ता शिंदखेडा येथील मूळ रहिवासी असलेले ज्ञानेश्वर कुंभार ( नाव बदललेले आहे ) यांनी निम गावी शेतीसह वीट भट्टीचा व्यवसाय थाटून कायमस्वरूपी वास्तव्य करून आहेत , त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दरवर्षी लागणार नाहरकत दाखल्यासाठी ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांच्याकडे मागणी केली , त्या मोबदल्यात ग्रामसेवकाने २७ हजार ५०० रुपये मागणी केली , ग्रामसेवक अवास्तव रक्कम मागत असल्याने तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती , तक्रारदार यांचा सुमारे मागील 30 वर्षापासून निम ग्रामपंचायतीच्या हद्दीत वीटभट्टीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे तहसील कार्यालय अमळनेर यांच्या नावे सहा हजार रुपयांची रॉयल्टी भरल्यानंतर
आरोपी ग्रामसेवकाने निम गावच्या ग्रामपंचायत हद्दीत जर वीटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल, असे सागत या दाखल्याच्या मोबदल्यात 17 व 23 जानेवारी रोजी 27 हजार 500 रुपयांची लाच मागितली होती व 25 हजारांत तडजोड झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शशिकांत पाटील यांनी सांगितलेल्या कोडवर्ड नुसार सोमवारी दुपारी निम ग्रामपंचायत कार्यालयात आरोपीने रोख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच तक्रारदार यांनी जोरदार शिंक देताच सापळा रचून बसलेल्या पथकाने छापा टाकून मुद्देमालसह ग्रामसेवक राजेंद्र पाटील यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपी विरोधात मारवड पोलिसात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव,पोलीस नाईक ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, पोलीस कॉन्स्टेबल सचिन चाटे तसेच पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव,सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनील वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींनी यशस्वी केला. त्यांना नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे ,अप्पर पोलीस अधीक्षक एन एस न्याहळदे ,पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






