जळगाव :- येथे घटने परिसरात खळबळ उळाली असून या प्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून दोघांना कोठडीत रवाना केले आहे.या बाबत सविस्तर व्रत असे की ,अनैतिक संबंधाच्या आड येणार्या मुलास गळफास देऊन ठार केले.
पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय-१४) रा. सावखेडा शिवार, जलाराम नगर जळगाव असे मयत मुलाचे नाव आहे. तर त्यांची आई मंगलाबाई विलास पाटील (वय-३५) रा. जलाराम नगर आणि प्रमोद जयदेव शिंपी (वय-३८) रा. विखरण ता. एरंडोल असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे.
सावखेडा शिवारात असलेल्या जलाराम नगरात विलास नामदेव पाटील हे राहतात. विलास पाटील हे चालक असून पत्नी मंगला पाटील आणि प्रमोद शिंपी यांचे वर्षभरापासून सूत जमले होते. त्यांच्या अनैतिक संबंधांमध्ये मुलगा प्रशांत पाटील हा अडसर ठरत असल्याने त्याची आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांनी मुलाला १६ जानेवारी रोजी रावेर येथून कबुतर ठेवण्याचा पिंजरा घेवून येवू असे आमीष दाखवून प्रशांत याला त्याची आई मंगलबाई आणि प्रमोद हे दोन्ही सोबत घेवून मध्यप्रदेशातील बर्हाणपुर गावानजीकच्या जंगलात घेऊन गेले.
त्यांनी प्रशांत पाटील याला गळफास देवून झाडाला लटकावून दिले. तेथून ही महिला पुन्हा जळगावात घरी आली. इकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार प्रशांतचे वडील विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलीसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी तांत्रिक मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी तपासाला सुरूवात केली.
पोलीसांनी २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी प्रमोद जयदेवर शिंपी याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यासाठी मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघांना अटक केली. पोलीसांनी बर्हाणपुर येथील जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला.