बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त एरंडोलला कार्यक्रम. पहा भव्य मोटरसायकल रॅलीच्या व्हिडिओ

Spread the love

एरंडोल– बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील यांच्याहस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

रॅलीत जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत) यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मोटरसायकलवरील भगवे ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.रॅलीचे शहरात ठिकठीकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले.रॅलीच्या मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांच्या पुतळ्यास सभापती अमोल पाटील यांचेसह मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.

पहा भव्य मोटरसायकल रॅलीच्या व्हिडिओ

यावेळी सभापती अमोल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श समोर ठेवून काम करीत असल्याचे सांगितले. बाळासाहेबांच्या शिवसेनेत कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असून आगामी काळात मतदार संघात पक्षाचे संघटन मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची तसेच आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांची माहिती नागरिकांना द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील,शहरसंघटक मयूर महाजन, जिल्हा दुध संघाचे संचालक दगडू चौधरी, चिंतामण पाटील,कृष्णा ओतारी,गणेश मराठे,भाजपचे शहराध्यक्ष आबा चौधरी,कासोद्याचे सरपंच महेश पांडे,रवंजे सरपंच देविदास चौधरी,जवखेडे सरपंच वीरेंद्र पाटील,आडगावचे उपसरपंच दिलीप पाटील,ग्रामपंचायत सदस्य गौरव पाटील, सुदाम राक्षे,मुकुंदा पाटील,मुश्रीफ पठान,रवि मराठे,पद्माकर मराठे,शिवाजी पाटील,प्रवराज पाटील, गोविंदा बिर्ला,गोविंद राठोड,गुड्डू जोहरी,दत्तराज पाटील, छोटू मराठे,भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत महाजन,जगदीश चौधरी,रवींद्र सोनार,निलेश जोहरी, सतीश जोहरी,लोकेश महाले,निलेश महाजन, निखील पाटील,मयूर पाटील,मनोज भेलासेकर,भूषण मराठे, लोकेश महाले,निलेश बडगुजर,पावन पाटील,सोनू शेलार यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे पण वाचा

टीम झुंजार