प्रतिनिधी:- निंभोरा
तासखेडा ता.रावेर येथील वीटभट्टी जवळ मोठ्या प्रमाणात जेसीबीद्वारे अवैध माती उत्खनन झाले असून वृतांकन करीत असताना जेसीबी मालक शुभम विकास पाटील रा.तासखेडा ता.रावेर जि.जळगाव यांनी पत्रकार अनिल इंगळे तासखेडा मंडे टू मंडे न्यूज चे वार्ताहर यांना शिवीगाळ करून त्यांचेकडील चित्रीकरण करीत असलेला रेअलमी कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली असून त्यांचे जीवास काही एक बरेवाईट झाल्यास सदर व्यक्ती जबाबदार राहील.
सदर लघु पाटबंधारे यांच्या असलेलेल्या जमिनीवर अवैधरीत्या माती उत्खनन करण्यात आलेले असून तशा प्रकारचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच प्रकारे अशा अवैध माती उत्खनन तसेच अवैध गौणउत्खननाच्या घटना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असून महसूल प्रशासनाने सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित जेसीबी मालक यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
तरी महोदय आपणास विनंती आहे कि, संबंधित प्रकरणाची लवकरात लवकर सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी व तसा कार्यवाही अहवाल देण्यात यावा.मा.तहसीलदार सो रावेर ता.रावेर
मा.उपविभागीय अधिकारी सो फैजपूर भाग फैजपूर यांना रावेर ग्रामीण पत्रकार संरक्षण समिती ने निवेदन दिले.निवेदनाप्रसंगी रावेर ग्रामीण पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष प्रदीप महाराज पंजाबी,उपाध्यक्ष युसूफ शहा,भीमराव कोचुरे,संघटक अनिल इंगळे,फरीद शेख,प्रसिद्धि प्रमुख चंद्रकांत वैदकर,योगेन्द्र भालेरावं,मंडे टू मंडे चे मुख्य संपादक भानुदास भारंबे आदी नी अव्वल कारकून तडवी साहेब यांना दिले .






