एरंडोल :- दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी तहसील कार्यालय दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय युवती सभा मंच यांचा संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील 14 विद्यार्थिनी आपला सहभाग नोंदवला याप्रसंगी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो माझे मतं माझे भविष्य, मतदानाचे महत्व, महिला सबलीकरण इत्यादि विषय रांगोळी स्पर्धेसाठी देण्यात आले होते.

याप्रसंगी यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब अमित पाटिल, एरंडोल नगरीच्या तहसीलदार माननीय सुचिता चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एन्.ए. पाटिल, उप प्राचार्य डॉ. ए. ए बडगुजर यांनी स्पर्धेला भेट दिली व सहभागी विद्यार्थीनींचे कौतुक केले. रांगोळी स्पर्धेत विजेते प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रम राजेश्वरी भगवान सोनार, श्वेता गोपाल शिंपी, निकिता गजानन पाटिल, अश्विनी अनिल चौधरी यांना युवती सभा मंचाच्या वतीने बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.परीक्षणाचे काम के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या आर्ट टीचर शीतल पाटील यानी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. के जे वाघ, डॉ स्वाती शेलार, डॉ. मीना काळे, डॉ रेखा साळुंखे, डॉ. शर्मिला गाडगे डॉ. सविता पाटिल यांनी सहकार्य केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






