जितेंद्र चव्हाण यांची कुठे झाली निवड; काय आहेत कारण.

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी । योगेश पाटील


धरणगाव प्रतिनिधी:– पुरोगामी संघर्ष परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष पदी धरणगाव येथील जितेंद्र चव्हाण उर्फ आबा यांची निवड करण्यात आली. पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री.प्रा.सुभाष वायदंडे यांनी त्यांना नुकतेच नुकतेच नियुक्त पत्र दिले आहे.

निवडीनंतर बोलताना जितेंद्र चव्हाण म्हणाले की उत्तर महाराष्ट्रात आदिवासी समाजाबरोबर इतर ही समाजास बरोबर घेऊन धुळे,नाशिक,अहमदनगर,जळगाव या जिल्ह्यांमध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेची बांधणी मजबूत करून तळागाळातील लोकांना अन्यायाच्या विरोधात खंबीरपणे स्वतःचे मत मांडण्याचे धाडस निर्माण करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करणार आहोत. त्यांच्या या निवडीमुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


या प्रसंगी परिषदेच्या कार्यकारिणीत विक्रम चव्हाण यांची जिल्हाध्यक्ष पदी तर राहुल चव्हाण जिल्हा युवा अध्यक्ष , मुकेश चव्हाण संघटक तथा सल्लागार, ज्ञानेश्वर चव्हाण तालुका अध्यक्ष, विजय चव्हाण ग्रामीण तालुका अध्यक्ष, अजय चव्हाण ग्रामीण उपतालुका प्रमुख, मंगल चव्हाण धरणगाव शहर प्रमुखपदी तर सुरेश पवार यांची ग्रामीण उपशहर प्रमुख पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

टीम झुंजार