परिक्षा पे चर्चा संकल्पने अंतर्गत न्यू.इंग्लिश स्कुल निंभोरा येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी
परमानंद शेलोडे

निंभोरा :- येथे मा . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा या अंतर्गत चिञकला स्पर्धा उपक्रम दिनांक २५/०१/२०२३.बुधवार रोजी राबविण्यात आला. इयत्ता ९ वी ते १२ वी चे विद्यार्थी न्यु इंग्लिश स्कूल निंभोरा येथे उपस्थित होते.यात निंभोरा येथील न्यु इंग्लिश स्कूल व सौ.डि.आर. चौधरी माध्यमिक विद्यालय निंभोरा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. चिञकला स्पर्धा परिक्षा निरीक्षक म्हणून श्री. प्रताप महाजन विषय शिक्षक व विनोद वाल्हे सर. बि आर सी रावेर , पंचायत समिती रावेर हे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यु इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री.टी.पी.बोरोले सर,मुख्याध्यापिका खान मॅडम, तसेच विजय पाटीलसर,प्रदिप झांबरे सर,नितीन भोगे सर,अजय भालेराव सर, शैलेश सुर्यवंशी सर,ए.आर बागुल सर,अरविंद महाजन सर,वसुंधरा नेमाडे मॅडम,उदय अवसरमल सर, सरफराज तडवी सर, कुंदन भारंबे सर तसेच शाळेतील सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार