पिंप्री – पिंप्री खु येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा..!

Spread the love

प्रतिनिधी –

पिंप्री खु ता धरणगाव :- येथील आदर्श बालक , प्राथमिक , माध्यमिक विद्यालय तसेच प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडिअम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिवस अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात साजरा झाला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी गावात रॅली मध्ये सहभागी होत घोषणा देत आपल्या देशा विषयी ऋण प्रकट केले . तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वेदमाता गायत्री बहुउद्देशिय संस्थेचे संचालक प्रमोद चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले .

या वेळी संस्थेचे सचिव विनोद चौधरी , आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही एम चौधरी , माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भावना भाट आदी उपस्थित होते . विद्यार्थी व शिक्षक यांनी भारतीय संविधान व आपला देश यावर सखोल माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी अजयसिंग पाटील यांनी त्यांची कन्या भविष्या पाटील हिच्या जन्म दिवस निमित्ताने उत्कृष्ट वक्तृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षिसे दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले . सूत्रसंचालन सतिष शिंदे तर आभार विलास पाटील यांनी मानले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार