जळगाव : – सध्या महाराष्ट्रात मुलीवर अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगावातील चाळीसगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरूणीला चाकूचा धाक दाखवत तरूणाने तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीसोबत असलेल्या प्रेम संबंधातून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आणि चाकूचा धाक दाखवत तरुणाने २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी काल गुरुवारी आरोपी किरण कोलते विरोधात त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन मित्रांविरुद्ध मेहूणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील निधोरा या गावातील किरण भाऊसाहेब कोलते याचे चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २१ वर्षे तरुणी सोबत प्रेम संबंध होते. १३ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास किरण हा त्याच्या तीन मित्रांसोबत तरुणी राहत असलेल्या परिसरात आला. यादरम्यान किरण याने तरुणीला बोलावून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच चाकूचा धाक दाखवत, तरुणीला मित्रांच्या मदतीने बळजबरीने कारने औरंगाबाद येथे नेले.
या ठिकाणी किरण याने त्याच्या घरी सलग दोन दिवस तरुणीवर बळजबरीने अत्याचार केले. त्यानंतर तरुणीला एकटीला औरंगाबाद शहरातील सिडको येथील बस स्टँडवर सोडून किरण निघून गेला. भेदरलेल्या अवस्थेत तरुणी तिच्या गावी पोहचली व त्यानंतर तिने या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून गुरुवारी किरण कोलते याच्यासह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण हे करत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






