परमेश्वराच्या भक्तिने दारिद्रय नष्ट होऊन आत्मिक समाधान मिळते- संजय महाराज

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

रावेर :- ( निंभोरा ) येथिल गजानन नगर मध्ये मरीमाता मंदिराच्या समोर भव्य संगितमय शिवपुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे दि.१८ ते २५ जानेवारी दरम्यान भव्य आयोजन समस्त गावकरींच्या सहकार्याने करण्यात आले होते. या शिवपुराण कथेचे वाचन ह.भ.प संजय महाराज ब्राम्हंदा यांच्या अमृत वाणीतून होत होते त्यांनी परमेश्वराच्या भक्तिने व चिंतनाने दारिद्रय नष्ट होऊन आत्मिक समाधान मिळते.

तरूण वयात कोणताही निर्णय घेतांना आई वडिलांना डोळ्या समोर ठेवा असे सांगत आई वडिलांचे महत्व विषद करत काल्याच्या किर्तनाने शिवकथेचा समारोप करत भाविकांना भारावून टाकत संपूर्ण वातावरण शिवमय करून टाकले यावेळी त्यांना संगितासाठी गायनाचार्य ह.भ.प प्रमोद महाराज टाकळी, ह.भ.प विठ्ठल महाराज तोरनाळा, ह.भ.प हरीदास महाराज वसंतनगर जामनेर, हभप सुभाष महाराज, घनश्याम भंगाळे, कैलास महाज

शोक पाटील, गोपाळ चौधरी. मृदंगाचार्य ह.भ.प विशाल महाराज सावळा मायेली, आँर्गान वादक ऋषीकेश पाटील टाकळी, तबला वादक हभप विशाल महाराज सावळा मारोती यांची सोबत लाभत असून श्रीराम भजणी मंडळ, महिला भजणी मंडळ, भगवती दुर्गा मंडळ, साई टेंट हाऊस व साउंड सर्विस तसेच पंचक्रोशीतील भजणी मंडळ व समस्त ग्रामस्त मंडळी व तरूण सहकार्य केले. कथेत रोज सकाळी ०५ ते ०६ काकळ आरती, ०९ ते १२ व दुपारी ०३ ते ०५ शिवपुराण कथा वाचन. संध्याकाळी ०५ ते ०६ हरीपाठ व रात्री ०८ ते १० किर्तन असे नियोजन होते या साठी किर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज बोरखेडी, हभप श्रीराम महाराज दाभाडी, हभप निवृत्ती महाराज शेगांव, हभप दुर्गादास महाराज खिर्डी बु, हभप सोपान महाराज सिरसोदा, हभप नारायण महाराज भामलवाडी, हभप बालकृष्ण महाराज वरणगाव, हभप समाधान महाराज रेंभोटा व कथावाचक हभप संजय महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने समारोप झाला.

२५ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ०५ महाप्रसाद व सायंकाळी ०५ ते ०८ भव्य दिंडी सोहळा व ०८ ते १० भारूडाने समारोप झाला.यावेळी पुरूष ,व महिला भजनी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार