जगात सोशल मीडियाचा वापर मागील काही वर्षांपासून तीव्र गतीने वाढला आहे, त्यातच फेसबुक नंतर व्हाट्सअप ने अनेक लोकांच्या मनावर राज्य केले आहे. व्हाट्सअप ॲप असे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी एकाच वेळेस अनेकांना मेसेज पाठवले जाऊ शकतात. जवळपास या ग्रुपमध्ये मेंबर समाविष्ट करण्याची मर्यादा आहे.मात्र या ग्रुप सदस्यांपैकी कुणीही काही आक्षेपार्ह मेसेज टाकल्यास ग्रुप Admin वर कारवाईची टांगती तलवार असते.
लोकांच्या भावना भडकावणे, दंगल घडवणे यासारखे चुकीचे अफवा पसरवणारे मेसेज व्हॉट्सअपवर प्रचंड व्हायरल होतात. त्यात एखाद्या ग्रुपमध्ये असा मेसेज आल्यास त्यावर Admin काहीच करु शकत नव्हता. मात्र आता व्हॉट्सअप यूजर्स एक्सपीरियंस वाढवण्यासाठी नवनव्या फिचर्सची भर पडली आहे. आता WhatsApp कडून देण्यात आलेला नवा फिचर ग्रुप एडमिनसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअपच्या या नव्या फिचरमुळे ग्रुप एडमिन कुठल्याही मेसेजला सर्वांसाठी डिलीट करु शकतो.
रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, व्हॉट्सअप लवकरच हा फिचर जारी करणार आहे. या फिचरमुळे ग्रुप एडमिनला पहिल्यापेक्षा अधिक अधिकार मिळणार आहेत. ग्रुप एडमिन ग्रुपसाठी योग्य नसलेले मेसेज डिलीट करु शकतील. याबाबत WhatsApp च्या अपकमिंग फिचरवर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo साइटवर रिपोर्ट दिला आहे. या वृत्तानुसार, लवकरच व्हॉट्सअप एंड्रॉयर्ड यूजर्ससाठी हा पर्याय उपलब्ध होईल. पुढील फिचरसाठी बीटा अपडेट जारी केला आहे.
स्क्रीनशॉटमध्ये दाखवण्यात आलंय की, जर कुठल्याही मेसेजला ग्रुप एडमिननं डिलीट केले तर त्याखाली एक नोट डिस्प्ले असेल ज्यात हा मेसेज एडमिननं डिलीट केल्याची माहिती दिसेल. त्यामुळे ग्रुपमधील इतर यूजर्सना सहजपणे ग्रुप एडमिननं हा मेसेज डिलीट केल्याचं कळेल. या फिचरमुळे ग्रुप एडमिनकडे ग्रुपची पॉवर असेल. तो अनावश्यक, अफवा पसरवणारे, चुकीचे मेसेज डिलीट करु शकतो. परंतु हा फिचर सर्वांसाठी येण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. WhatsApp आपल्या युजर्संना अनुभव अधिक चांगला करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणते. काही दिवसांपूर्वी WhatsApp वर चॅट बेस्ड वॉलपेपर सपोर्ट जोडण्यात आले होते. ज्याद्वारे युजर्स प्रत्येक चॅट आणि ग्रुपवर वेगवेगळे चॅट बॅकग्राउंड सेट करू शकतात. तसेच, WhatsApp वर व्हॉईस कॉल करताना, डिफॉल्ट स्क्रीन बॅकग्राउंड होईल