मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जर्मनीने बेल्जियमला सडन डेथ शूटआऊटमध्ये ५-४ असे नमवून हॉकी विश्वचषक स्पर्धेचे तिसर्यांदा विजेतेपद पटकाविले. गतविजेत्या बेल्जियमला विजेतेपद राखण्यात अपयश आले. पूर्ण वेळेपर्यंत सामना ३-३ असा बरोबरीत राहिल्यानंतर शूटआटमध्येही ३-३ अशीच बरोबरी झाली. त्यामुळे सामना सडन डेथ शूटआऊटमध्ये खेळविण्यात आला.
हॉकी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ०-२ ने पिछाडीवर असताना जर्मनीने जोरदार आक्रमण करत बेल्जियमला
नामोहरम केले. त्यामुळे जर्मनीला २००६ नंतर प्रथमच हॉकी विश्वचषक उंचावण्याची संधी मिळाली.