उस्मानाबाद : – रुग्णालयाबाहेर खेळत असताना डोक्यात ऑक्सिजनचे सिलिंडर डोक्यात पडल्याने एका ९ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहरांमध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आर्यन अमर नलवडे वय नऊ वर्ष असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.
आर्यन हा वाशी शहरातील एका खासगी हॉस्पिटल समोर खेळत होता. त्यावेळी त्या ठिकाणी ठेवलेले ऑक्सिजनचे सिलेंडर आर्यन याच्या डोक्यात पडले आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
दरम्यान या घटनेनंतर आर्यन याचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. रुग्णालयाच्या समोर ठेवण्यात आलेले ऑक्सिजनचे सिलिंडर अत्यंत बेजबाबदारपणे ठेवण्यात आले होते, असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ :
या प्रकरणात रुग्णालयाच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आर्यनच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. त्यानंतर प्रशासनाने मध्यस्ती केल्यानं हा वाद मिटला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.