कल्याण :- येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर 32 वर्षीय महिलेने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दारू व अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन मुलाला लावत महिलेने नाशिक येथे बोलावत त्याचे शोषन केले.तसेच स्वतःचे व मुलाचे काही अश्लील व्हिडीओ देखील तिने बनविले आहेत. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात किर्ती (वय 32) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 वी मध्ये शिकणारा अल्पवयीन मुलगा हा कल्याण येथे राहणार आहे. पीडित मुलाची आत्या ही नाशिक येथे रहाते मुलाचे आत्याकडे जाणे येणे असल्याने त्याची नाशिक येथे राहणाऱ्या किर्ती हिच्याशी ओळख झाली.सदर महिला ही मुलाच्या कुटुंबाच्या देखील ओळखीची आहे. ओळखीचा फायदा घेत किर्ती हिने मुलासोबत ओळख वाढवली. त्याला दारू व अश्लिल फिल्म बघण्याचे व्यसन लावले. दरम्यान तिने मुलाला आमिष दाखवत नाशिकला बोलावलं आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर देखील हॉटेलात नेऊन तिने मद्यपान केले व मुलाला देखील करायला लावले. त्यानंतर त्याच्यावर अत्याचार करत तिचे व मुलाचे काही व्हिडीओ बनविले. मुलाचे अभ्यासात लक्ष नाही तो सतत फोनवर बोलत असतो त्यामुळे मुलाच्या आईने त्याचा मोबाईल तपासला असता ही बाब उघडकीस आली.आईने याबाबत मुलाकडे विचारणा केली असता, हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. मुलाच्या कबुलीनंतर आईने त्याला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि सदर महिले विरोधात तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्या महिलेवर बाल लैंगिक शोषण कायद्यान्वे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास सुरू केला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






