जळगाव,(प्रतिनिधी)- बुद्धिस्ट क्रिकेट लीग आयोजन समितीच्या वतीने तीन दिवसीय ‘बुद्धिस्ट क्रिकेट लीग’ चे उदघाटन जेष्ठ विधितज्ञ ऍड. राजेश झाल्टे यांच्या हस्ते आज दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, ऍड. शुभम झाल्टे आदी उपस्थित होते.
शहरातील जी. एस. ग्राउंड वर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ३ तारखे पर्यंत मॅचेस सुरु राहणार आहेत. स्पर्धेच्या सुरवातीला बौद्ध धम्मगुरू भन्ते सुगतवंस महाथेरो यांनी त्रिशरण पंचशील घेत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम रंधे यांनी केले. यावेळी टीम ओनर प्रसाद तायडे, विशाल अहिरे, आशिष सपकाळे, योगेश नन्नवरे, सतिष गायकवाड, जितेंद्र केदार, विजय निकम, अनुप मनुरे यांची उपस्थिती होती.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४