जळगाव : – रेल्वे रुळाजवळ शौचालयाला बसणे वृद्ध व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने ६० वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार सकाळी आठच्या सुमारास जळगाव शहरातील पिंप्राळा पसिरातील रेल्वे लाईनजवळ घडली आहे.
रेल्वे रुळाजवळ शौचालयाला बसणे वृद्ध व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने ६० वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार सकाळी आठच्या सुमारास जळगाव शहरातील पिंप्राळा पसिरातील रेल्वे लाईनजवळ घडली आहे. अशोक नंदलाल चव्हाण असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते जळगावमधील धरणगाव तालुक्यात खंडेराव नगरात वास्तव्यास होते.
अशोक चव्हाण पत्नी, मुलगा व सुना यांच्यासोबत खंडेराव नगरात वास्तव्याला होते. मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास अशोक चव्हाण घरापासून जवळ असलेल्या रेल्वे रूळाजवळ शौचालयासाठी गेले. दरम्यान, धावत्या रेल्वेचा डोक्याला फटका बसल्याने त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. परिसरातील राहणारे तरुणांनी अशोक चव्हाण यांची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस कॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे, निलेश पाटील करत आहेत.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






