मुंबई : – सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात अश्यातच 26 जानेवारीला सर्वत्र प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता. पण मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकावर मन हेलावून टाकणारी घटना घडली. प्रत्येक नोकरदार माणूस हा आपल्या कामावर, तिथल्या वस्तूवर प्रचंड प्रेम करत असतो. जर ड्रायव्हर असेल तर तो गाडीच्या आधी पाया पडतो आणि मगच पुढचा प्रवास सुरू करतो. मुंबईमध्ये लोकल चालवणाऱ्या मोटरमनसोबत मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका मोटरमनने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
पहा व्हिडिओ :
दुपारी 12.47 च्या सुमारास एका व्यक्तीने धावत्या लोकलच्या समोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव राकेश गौड आहे. ते पश्चिम रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून कार्यरत होते.
राकेश गौड हे बऱ्याच वेळ विलेपार्ले स्थानकावर बऱ्याच वेळ उभे होते. लोकल येण्याची ते सारखे वाट पाहत होते. लोकल जशी स्थानकावर येणार असं दिसलं तेव्हा गौड यांनी रुळावर उडी मारली आणि खाली झोपले. लोकलचा वेग कमी होता पण तोपर्यंत बराच उशीर झाला. गौड यांचा जागीच मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौड हे कुठल्या तरी आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे आजारापणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी होती. घरातून गौड बाहेर पडले आणि विलेपार्ले रेल्वे स्थानकावर येऊन थांबले. बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. जी लोकल गाडी चालवली त्याच गाडीखाली येऊन गौड यांनी आयुष्य संपवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.