गौरवकुमार पाटील / अमळनेर
जळगाव येथील बीजे मार्केट मधील कौटुंबिक न्यायालयाचा सहाय्यक अधीक्षक हेमंत दत्तात्रय बडगुजर वय ५७ यास दिनांक २ फेब्रुवारी रोजी जळगांव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने सापळा रचून २०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली , पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी राबविलेल्या लाच खोरांविरुद्धच्या मोहिमेत जिल्ह्यातील ही दोन आठवड्यात सहावी कारवाई यशस्वी केल्याने लाचखोरांचे धाबे दणाणून सोडले आहे ,
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रानुसार जळगाव येथील ३१ वर्षीय पुरुष तक्रारदार व त्यांच्या पत्नीत कौटुंबिक वाद होते ,म्हणून तक्रारदाराने पत्नी विरुद्ध जळगाव येथील बीजे मार्केट मधील कौटुंबिक न्यायालयात पत्नी नांदावयास यावी म्हणून दावा दाखल होता , व पत्नीने देखील तक्रारदार यांचे विरुद्ध त्याच कौटुंबीक न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला आहे. सदर दाव्यात कौटुंबीक न्यायलयाने तक्रारदार यांना ८५,०००/-रुपये एकरकमी खावटी रक्कम देण्याचा आदेश दिला
असुन सदर खावटीची एकरकमी रक्कम जमा करणे करीता तारीख वाढवून मिळवून देण्याच्या मोबदल्यात यातील तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष कौटुंबिक न्यायालयाचा लाचखोर सहाय्यक अधीक्षक हेमंत बडगुजर यांनी २००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच मागणी केलेली रक्कम जळगाव बी.जे.मार्केट जळगाव येथील कौटुंबीक न्यायालयाच्या वरच्या माळ्यावरील गोविंदा कॅन्टीनजवळ पंचासमक्ष स्वतःस्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचे वर जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

वरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे यांनी काम पाहिले त्यांनाकारवाईसाठी स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ .सचिन चाटे, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांनी मदत केली तर सापळा व तपासअधिकारी संजोग बच्छाव,पोलिस निरीक्षक हे करीत आहेत
हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






