VIDEO : जळगावकरांमध्ये खळबळ! सायंकाळी आकाशात दिसली रहस्यमय वस्तू ; व्हिडिओ पाहून तुम्हीही गोंधळाल

Spread the love

जळगाव : – गुरुवारी संध्याकाळी आकाशात दिसलेल्या अज्ञात वस्तूने जळगावकरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबद्दल खगोल शास्त्रज्ञांकडून मोठी माहिती देण्यात आली असून हे नेमकं काय होतं, याबद्दल माहिती त्यांनी दिली आहे.

अवकाशात गुरुवारी सायंकाळी सात वाजता दिसलेल्या रहस्यमय वस्तूने जळगावकरांमध्ये खळबळ उडाली. मात्र, अवकाशातून गेलेली वस्तू ही उल्का किंवा धूमकेतू नव्हता, तर ते एक सॅटॅलाइट असल्याची माहिती खागोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

आज गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अवकाशातून जणू रेल्वे धावत असल्याचे दुर्मिळ चित्र जळगावकरांना दिसले. या वस्तूमुळे जळगाव करांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला. लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी आकाशात हे सॅटलाईट पाहिल्यामुळे नागरिक गोंधळल्याचंही पाहायला मिळालं.

पहा व्हिडिओ :

याबाबत अवकाश अभ्यासात सुरेश चोपणे यांना विचारले असता त्यांनी, अवकाशात आढळून आलेली वस्तू म्हणजे स्पेसएक्स ही कंपनी अवकाशात सोडलेले स्टार लिंक सॅटेलाइट असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हे सॅटॅलाइट शुक्रवारी देखील रात्री आठ वाजता सुमारास दिसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार