गौरवकुमार पाटील / अमळनेर
अमळनेर :- पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) व RCP जळगांव अशांनी अमळनेर शहरातील संमिश्र वस्तीतून पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदरील पोलीस रूट मार्च हा आगामी काळातील सण व उत्सव लक्षात घेता पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने आज पथसंचलन करण्यात आले. सदरील पोलीस रूट मार्च हा पोलीस कवायत मैैदानापासून सुरु करुन पवन चौक, झामी चौक, माळीवाडा, बहादरपुर नाका, भोईवाडा, कसाली डीपी, वाडी चौक, पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा व शेवटी समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधलीपूरा पोलीस चौकी येथे येऊन पथसंचलनाची सांगता झाली.
यात डीवायएसपी श्री. राकेश जाधव, रॅपिड अॅक्शन फोर्सच डेप्युटी कमांडंट शशिकांत राय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे, RAF चे निरीक्षक श्री.संतोष कुमार यादव, निरीक्षक श्री. राजकुमार सिंग, निरीक्षक श्री. बलकारसिंग, निरीक्षक श्री. अजयकुमार सिंग, मारवड पो. स्टे. सपोनि श्री. जयेश खलाने, पोलीस उपनिरीक्षक श्री. नरसिंह वाघ, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती. अक्षदा इंगळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. विकास शिरोड तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे ४५ अमलदार तसेच RPF चे ७० पुरुष कमांडो व ५ महिला कमांडो अशा ७५ जणांची तुकडी सह पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च नंतर गांधलीपूरा पोलीस चौकीत शांतता कमेटीची बैठक पार पडली.
यात डीवायएसपी श्री. राकेश जाधव, डेप्युटी कमांडंट श्री. शशिकांत राय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांनी आगामी काळातील सण-उत्सव लक्षात घेता शहरात शांतता अबाधित राहून कायदा व सुव्यवस्था कसा राखता येईल याविषयी शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. या मीटिंग मध्ये शहरातील शांतता कमेटीचे सदस्य, माजी नगरसेवक, पत्रकार बांधव असे उपस्थितीत होते. सदर पोलीस रूट मार्च साठी ASI संजय पाटील, PN डॉ. शरद पाटील, PN दीपक माळी, PN रवि पाटील, PN सिद्धार्थ सिसोदे HC मधुकर पाटील अशांनी मेहनत घेतली. सदर शांतता बैठकचे सूत्रसंचालन व आभार गोपनीय शाखेचे डॉ. शरद पाटील यांनी केले.

हे पण वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






