असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळणार लाभ … त्यासाठी काय पात्रता हवी?

Spread the love

नवी दिल्ली : असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाईल, जे एक वर्षासाठी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे.

सर्व असंघटित क्षेत्रातील कामगार
आजपर्यंत तुम्ही ई-श्रम कार्डसाठी अर्ज केला नसेल किंवा या कार्डसाठी पात्रता काय असावी याबद्दल तुम्हाला माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ई-श्रम म्हणजे काय? या कार्डसाठी काय पात्रता हवी? जाणून घ्याअपघाती मृत्यू आणि कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी कामगारांसह, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगारांची नोंदणी या संकेतस्थळावर करता येणार आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात.नोंदणीसाठी वय किती ?ई-श्रम कार्डसाठी वय १६ वर्षांपेक्षा जास्त आणि ५९ वर्षांपर्यंतचा कोणताही कामगार पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतो. या वयामधील कोणतीही व्यक्ती कार्ड बनवू शकते. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असंघटित क्षेत्रात काम करणारे जे कामगार आयकर देत नाहीत. म्हणजेच, जर कामगार करदाता असेल तर त्याला ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा अधिकार नाही. फक्त तिथे असाच कामगार नोंदणी करू शकतो.

टीम झुंजार