पाचोरा – येथील बायपास हायवे लगत उड्डाणपुला जवळ असलेले वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ नरहर पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर पाचोरा तालुक्यातील”काही प्रमुख राजकीय व्यक्ती व काही तोडी पाणी वाले पत्रकार”असा शब्द प्रयोग करून सोशल मिडीयावर पोस्ट प्रसारीत केली सदर प्रकरणी दि.6 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी पत्रकारांची बैठक होऊन यात सदर डॉक्टर विरोधी पो. स्टे. ला तक्रार देण्याचा सदरचा निर्णय घेऊन
निषेध नोंदवण्यात आला व सन्मानिय डॉ. निळकंठ पाटील यांच्याकडे कोणत्याही पत्रकाराने तोडी- पाणीसाठी प्रयत्न केला असेल अथवा वारंवार प्रतिमा मलिन करत असतील किंवा प्रयत्नात असतील तर त्याचीही दखल घेऊन संबधित दोषीवर योग्य ती कायदेशिर कार्यवाही व्हावी सोबतच पाचोरा पो.स्टे. ला दि 1 फेब्रूवारी 2023 रोजी फुलचंद बडगुजर यांनी
आपल्या मुला संदर्भात योग्य त्या कागदपत्रांच्या आधारे वृंदावन हॉस्पिटल संचालकां विरोधात पाचोरा पो.स्टे. ला तक्रार अर्ज दिला असुन त्या अर्जाची देखील सखोल चौकशी होऊन दोषीवर दि.15 फेब्रुवारी पावेतो गुन्हा दाखल व्हावा अन्यथा दि.16 फेब्रू. पासुन लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पावित्रा घेणार असल्याचे 30 पत्रकारांच्या सहया असलेले निवेदन वजा तक्रार अर्ज पाचोरा पो. स्टे.ला देण्यात आला आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन