गौरवकुमार पाटील /अमळनेर
शिवाजी राजांचे कर्तुत्व आणि जीवन हे स्रीया,शेतकरी व शुद्राती शूद्र रयत यांच्या विकासासाठी होते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी सत्ता, बुद्धी, कौशल्याचा वापर केला. मानसशास्त्रज्ञ असलेल्या शिवरायांचा खरा इतिहास जनतेसमोर गेला पाहिजे असे , प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. डॉ.लीलाधर पाटील यांनी केले .युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या वक्त्यां च्या कार्यशाळेत”ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते .
अध्यक्ष स्थानी धनदाई कॉलेजचे चेअरमन, बापूसाहेब के डी पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीप घोरपडे, शैलेंद्र पाटील, व रामेश्वर भदाणे होते.
राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या वतीने दिनांक 10 फेब्रुवारी 2023 ते 25 फेब्रुवारी23 हा पंधरवडा शिवजयंती म्हणून साजरा करावयाचा आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात 75 वक्ते छत्रपती शिवाजी महाराजांवर 75 ठिकाणी भाषण देतील असा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अशोक पवार यांनी आवाहन केले आहे.
धनदाई महाविद्यालयात एक दिवशीय वाक्त्यांच्या कार्यशाळेत शिरूड, मंगरूळ, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय ,अमळनेर जी एस हायस्कूल, साने गुरुजी हायस्कूल, बोरा इंग्लिश मीडियम स्कूल, प्रताप कॉलेज ,डी आर हायस्कूल अमळनेर ,येथील 96 विद्यार्थी उपस्थित होते .याप्रसंगी अजय भामरे यांनी शिवरायांबद्दल उत्कृष्ट गीत सादर केले.

प्रा.डॉ. वंदना पाटील यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल, व प्रसिद्ध साहित्यिक गोकुळ बागुल यांच्या पुस्तकाला अहिराणी साहित्य परिषदेचा पुरस्कारमिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अशोक बि राडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.राहुल निकम यांनी केले . याप्रसंगी गौतम मोरे, मगन भाऊसाहेब, एम डी पाटील, प्रा. डॉ . विजय वाघमारे ,भाऊसाहेब देशमुख रावसाहेब पाटील, प्रा.डॉ. धनराज ढगे रणजीत शिंदे,गुणवंत पवार , विठ्ठल आप्पा, वाल्मीक मराठे, प्रा. इंगळे, प्रवीण पवार, अरुण सोनटक्के, उमाकांत ठाकूर, संदीप जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






