अमळनेर – पातोंडा – त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 7 फेब्रुवारी 2023 वार मंगळवार रोजी पातोंडा ,तालुकाः अमळनेर, जिल्हा :जळगाव या ठिकाणी अँड. रवींद्र गजरे सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन निळे वादळ ग्रुप, पातोंडा यांनी केले होते.
आपल्या व्याख्यान रुपी भाषणामध्ये अँड.रवींद्र गजरे सर यांनी माता रमाबाई यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंवर प्रकाशझोत टाकला. लहानपणापासूनच माता रमाई यांचे जीवन कसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी साधर्म्य दाखवते याचे स्पष्टीकरण अनेक उदाहरणांचे दाखले देऊन अँड. गजरे सर यांनी सांगितले. लहानपणीच माता रमाई यांचे मातृछत्र हरपले तसेच डॉक्टर बाबासाहेबांचे सुद्धा मातृछत्र हरपले. परंतु दोन्ही महानविभूतींनी सर्व बहुजनांना व सर्व घटकातील महिलांना मायेची सावली दिली, ज्या सावलीमध्ये आजतागायत सर्व बहुजन विसावा घेत आहेत.
कदाचित माता रमाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारणी नसत्या तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेऊच शकले नसते व भारतीय राज्यघटनेची अमूल्य अशी भेट ही भारताला देऊ शकले नसते असे प्रतिपादन अँड.गजरे सर यांनी केले.प्रसंगी निलेश पवार , सतिश शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपडू संदानशिव यांनी केले.
प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय मराठा सेवा संघाचे विलास चव्हाण सर यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा व अतिथींचा सत्कार विजय सोनवणे ,चेतन ढीवरे ,भुरा संदानशिव व महेंद्र पाटील सर यांनी केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील वानखडे रमेश संदानशिव, किरण शिरसाठ, संदीप बैैसाने ,सर्वेश गव्हाणे समाधान संदानशिव,रोहित संदानशिव , आनंद बैसाणे यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी गावातील असंख्य तरुण , वृद्ध व महिला यांची उपस्थिती लाभली.
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम