अमरावती : बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना गुरुवारी (दि.९) कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. चुलत भावानेच आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण केल्यामुळे ती गर्भवती झाली.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी १९ वर्षीय चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काही महिन्यांपूर्वी पीडित 15 वर्षीय मुलगी व तिच्या चुलत भावाची भेट झाली. यावेळी चुलत भावाने तू माझी बहीण आहेस, हे मला माहित आहे. पण, तरीही तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे तिला म्हटले. मात्र, तिने नकार दिला.
परंतु, त्याच क्षणापासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर बोलणे सुरू झाली. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी चुलत भावाने तिला तू मला खूप आवडतेस, असे म्हणून शरीरसुखाची मागणी केली. त्यासाठी त्याने तिला धमकीसुद्धा दिली. त्यानंतर त्याने तिचे लैंगिक शोषण केले. तेथून सलग 8 दिवस त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत माहिती पडल्यास कुटुंबातील सदस्य मारतील, या भीतीने तिने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही.

दरम्यान, 6 फेब्रुवारी रोजी शाळेतून परत येत असताना पीडितेला स्वत:मध्ये काही शारीरिक बदल जाणवल्याने तिने याबाबत आपल्या मैत्रिणीला सांगितले. त्यानंतर ती मैत्रिणीच्या सल्ल्याने तपासणीसाठी एका रुग्णालयात गेली. यावेळी डॉक्टरांनी तिला तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने याबाबत आपल्या आई व आजीला माहिती दिली.

त्यानंतर आईसह पुन्हा रुग्णालयात जावून तिने तपासणी केली. त्यावेळीही ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सूचविण्यात आले. त्यानुसार पीडितेने आईसह कोतवाली ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






