एरंडोलला तरुण, दिलदार,खेळाडू,व्यापारी असलेल्या युवकाने केली आत्महत्या,नाका परिसरातील सर्व दुकाने व शहरातील बिअर बार स्वयमफूर्तीने ठेवलीत बंद.

Spread the love

प्रतिनिधी | एरंडोल

एरंडोल-येथील म्हसावद रस्त्यावरील सरस्वती कॉलनीतील माजी नगराध्यक्षा वैशाली आंधळे यांच्या ३१ वर्षीय विवाहित मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली.आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.याबाबत माहिती अशी,कि म्हसावद रस्त्यावरील सरस्वती कॉलनीमध्ये माजी नगराध्यक्षा वैशाली आंधळे ह्या पती निवृत्त पोलीस कर्मचारी विठ्ठल आंधळे,विवाहित मुलगा विशाल आंधळे,दुसरा मुलगा सागर आंधळे,सून व नातवंडे यांचेसह राहतात.

विठ्ठल आंधळे यांचा मोठा मुलगा विशाल विठ्ठल आंधळे (वय-३१) याने सकाळी अकरा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या दुस-या मजल्यावरील घरात गळफास घेवून आत्महत्या केली.विशाल आंधळे हा दुस-या मजल्यावर झोपला होता.सकाळी अकरा वाजेच्या सुमारास युवकाचा लहान भाऊ सागर विठ्ठल वंजारी हा विशाल यास उठविण्यासाठी गेला असता घराचा दरवाजा बंद होता व विशालकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.सागर आंधळे याने चुलत भाऊ हर्शल शरद वंजारी यास मोबाईलवरून माहिती दिली.हर्शल वंजारी याने गोपाल वंजारी व मित्र अतुल मराठे यांचेसह विशाल आंधळे यांच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावला

जूनमात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे घराची खिडकी उघडली असता विशाल याने गळफास घेतल्याचे दिसून आले.सागर आंधळे,हर्शल वंजारी यांनी आरडाओरड करताच कॉलनीतील रहिवाशांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.सागर आंधळे,हर्शल वंजारी यांनी मित्रांच्या सहाय्याने विशाल यास खाली उतरवून डॉ.फरहाज बोहरी यांच्या दवाखान्यात आणले.डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर तो मयत झाल्याचे सांगितले.विशाल आंधळे याने गळफास घेतल्याचे समजताच आमदार चिमणराव पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, किशोर निंबाळकर,राजेंद्र चौधरी,रवींद्र महाजन,माजी नगरसेवक मनोज पाटील,बबलू पहिलवान,

विजय महाजन, जगदिश ठाकूर,चिंतामण पाटील,बबलू अहिरराव यांचेसह शहरातील सामाजिक व राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी माजी नगराध्यक्षा वैशाली आंधळे यांच्या निवासस्थानी धाव घेवून आंधळे परिवाराचे सांत्वन केले.विशाल आंधळे यांच्या मित्रपरिवाराने नोव्हेंबरमध्ये त्याचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला होता.अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभाव असणा-या विशालने गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत विशालवर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पच्छात आई माजी नगराध्यक्षा वैशाली आंधळे,वडील विठ्ठल आंधळे,भाऊ सागर आंधळे,पत्नी,पाच वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.याबाबत हर्शल वंजारी याने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे. का अनिल पाटील,मिलिंद कुमावत,जुबेर खाटीक,विलास पाटील तपास करीत आहेत.

दरम्यान विशाल हा छत्रपती क्रीडा मंडळाच्या उत्कृष्ट कबड्डी च्या खेळाडू होता.सन 2005 पासून ते 2018 पर्यंत कबड्डी खेळत होता सन 2016 यावर्षी चाळीसगाव शरदराव पवार चषक कबड्डी स्पर्धेत उपांत्य सामन्यात एका चडाई मध्ये 5 गुण मिळून दिल्यामुळे संघ विजयी झाला होता व विशाल हा या सामन्याच्या हिरो ठरला होता.

टीम झुंजार