भुसावळ : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शुक्रवारी खडकारोड परिसरात शनिवारी म्हणजे ४ तारखेला रात्री एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून एका शरीरसौष्ठवपटूवर हल्ला करण्यात आला होता. आता त्याचा मृत्यू झाला आहे.
दोन वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून झालेल्या प्राणघात हल्ल्यात जखमी असलेल्या शरीरसौष्ठवपटूचा रुग्णालयात पाच दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भुसावळ शहरातील खडकारोड परिसरात शनिवारी दिनांक ४ रोजी रात्री प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. अफाक अख्तर पटेल (वय ३०, रा. खडका रोड) असं मयत शरीरसौष्ठवपटूचे नाव आहे. या घटनेनंतर खडक रोड परीसरात तणावाचे वातावरण असून परस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात अफाक अख्तर पटेल हा वास्तव्यास होता. तो शनिवारी राहत असलेल्या परिसरातच हीरा हॉलजवळ उभा असताना जुन्या वादाच्या कारणावरुन रोमान शेख, शकील शेख, तेहरीन नासीर शेख, शेख समीर, शेख फिरोज आणि लतीफ तडवी यांनी रॉड आणि लाठ्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या कटात इसम दानिश शेख, फरीद शेख, शेख उबेद, शेख अक्रम, मुजम्मिल शेख फरीद, तोहिद शेख, नासीर शेख, अबुजर शेख, बशीर मुस्तफा शाह, युनुस शाह, नासीर सन्नाटा, बिलाल बागवान, शेख हमजा शेख रफीक, इम्मु कोलरीया, कल्लू तडवी, अक्रम शेख, सबदर शेख, कलीम उंद्री आणि शरीफ उंद्री याचाही सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्राणघातक हल्ल्यात अफाक पटेल याचे दोन्ही हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला होता. तसेच तो गंभीर जखमी देखील झाला होता. या प्रकरणी जखमी अफाक पटेल याच्या जबाबावरुन १८ जणांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गंभीर जखमी अफाक याचा उपचार सुरु असताना बुधवारी दिनांक ८ रोजी रात्री त्याची मृत्यूची सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून खडका रोड भागात तणावाचे वातावरण असून या ठीकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात तसेच अफाकचा दफनविधी करण्यात आला. यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
प्लॉटिंगचा व्यवसाय करणाऱ्या अख्तर पटेल यांचा अफाक हा एकुलता एक मुलगा होता. तीन बहिणींवर एकटाच असलेला अफाक हा एका जीममध्ये ट्रेनर तसेच रेल्वेस्टेशनवर ठेकेदारी करत अफाक हा वडिलांना घराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी मदत करत होता. काही वर्षांपूर्वीच अफाकचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. अफाकच्या मृत्यूने त्याच्या दोन्ही चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं आहे.
गेल्या १३ वर्षांपासून मेहनत घेत अफाक याने शरीर कसले होते. नाशिक, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, मुंबई अशा अनेक ठिकाणी वेटलिफ्टिंग तसेच ‘बॉडी शो’ अफाकने गाजवले होते. यात त्याला उत्कृष्ट बॉडी व वेटलेफ्टींग म्हणून पुरस्काराने सन्मानित सुध्दा करण्यात आले होते. दिसायला सुंदर तसेच कसलेलं शरीर यामुळे अफाकची तरुणांचा आयडल म्हणूनही परिसरात ओळख होती.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.