पत्रकार दिनानिमित्त श्रीगोंद्यात विविध उपक्रम

Spread the love

श्रीगोंदा : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारांमूळे समाजातील गोरगरीब, वंचित नागरिकांना न्याय मिळतो व पत्रकार हा सत्ताधाऱ्यांना योग्य दिशेने वाटचाल करण्यास भाग पाडतो. त्याच पत्रकारांना मात्र राजकीय, प्रशासकीय सवलतींपासून दूर रहावे लागते. तालुका पातळीवर पत्रकारांना अधिस्वीकृती, शासकीय जाचक अटी व राजकीय अनास्थेमुळे अनेक सोयी सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. पत्रकारांना पत्रकार भवन, वसाहत, मुलांचे शिक्षण, बस, रेल्वे, रस्ता टोल फ्री, पेन्शन या मूलभूत प्रश्नांवर शासन व राजकीय लक्ष वेधण्यासाठी नव्यानेच स्थापन झालेल्या श्रीगोंदा प्रेस क्लब संघटनेच्यावतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सोमवार (दि. ३) जानेवारी रोजी प्रतिकात्मक धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष विशाल चव्हाण व सचिव मीरा शिंदे यांनी दिली.

यावेळी चव्हाण म्हणाले की, पत्रकार भवनाबाबत श्रीगोंदयातील राजकारण्यांनी गेल्या १० वर्षांपासून मौन पाळून आहेत. पत्रकारांनी अनेक राजकिय नेते घडवले, सामाजिक कार्यकर्त्यांना बळ दिले, उपेक्षित घटकांना न्याय दिला. पण राजकीय, प्रशासकीय यंत्रणेने पत्रकार भवना बाबत दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा फक्त हारतुरे देऊन बोळवण केली. हा प्रश्न लवकरात लवकर प्राधान्याने घेऊन तालुक्यातील सर्व पत्रकारांनासाठी पत्रकार भवन, वसाहत व इतर प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी पत्रकार बंधू धरणे आंदोलन आंदोलनात सहभागी होणार आहेतयाचबरोबर ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून बुधवार (दि.५) जानेवारी रोजी श्रीगोंदा शहर व तालुक्यातील दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना साडी-चोळी, व आदर्श व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा, तालुक्यातील विचार, विकासात योगदान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात येणार असून उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले व पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव हे मार्गदर्शन करणार असून श्रीगोंदा तालुक्यातील भूमिपुत्र असलेले व राज्यात महसूल, पोलीस, विविध शासकीय सेवेत सेवा करणाऱ्या अधिकारी, उद्योजक, शिक्षक, आदर्श शेतकरी यांचा प्रेस क्लब वतीने सत्कार करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले

टीम झुंजार