Viral Video : इंटरनेटवर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ लोकांचे मनोरंजन करणारे असतात, तर काही व्हिडीओ पाहून लोकांचा थरकाप उडतो.अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. एक महिलेनं तिच्या गोंडस बाळाला थेट स्वमिंग पूलमध्ये फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या बाळाला पाण्यात पोहता यावं, यासाठी तिने बाळाला थेट स्विमिंग पूलमध्येच फेकलं. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. महिलेनं तिच्या बाळाला पाण्यात का फेकलं? असा प्रश्न अनेकांना पडला असेलचं.
पण व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल.एक महिला तिच्या लहान मुलाला स्विमिंग शिकवण्यासाठी पुलाच्या बाहेरून त्या मुलाल थेट पाण्यात फेकत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर ती महिलाही पाण्यात जाते आणि मुलाला हातांनी इशारा करून बाहेर बोलवण्याचं प्रयत्न करते. पाण्यात गेल्यानंतर लहान मुलगाही पोहण्यासाठी धडपड करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
त्यानंतर ती महिला मुलाल प्रेमाने जवळ घेते. मुलाल पाण्यात फेकल्यानंतर सुरुवातीला असं वाटतं की, हा मुलगा पाण्यात बुडेल. पण काही क्षणातच मुलगा पाण्यात पोहण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल.हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर @perspectivewow नावाच्या युजरने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, महिला स्विमिंग इंस्ट्रक्टर आहे.

पाण्यात पोहता यावं म्हणून त्या महिलेनं बाळाला पाण्यात फेकलं. या व्हिडीओला आतापर्यंत १.८ मिलियन व्यूज मिळाले आहेत. तर १८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लहान मुलगा पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लाखो नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……