जळगाव :-भोकर येथे नियोजित पुलाचे उदघाटन माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या कडून करण्यात येणार होते. त्या वेळेस शेतकरी बंधू अतिवृष्टी निधी अनुदान,विज समस्या,पिक विमा आदी समस्यांबाबत निवेदन देण्यात येणार होते पण त्या अगोदर सत्तेचा गैरवापर करून शेतकरी बंधू तसेच नेते मंडळी आदिना पोलीसांकडून अटक करून ताब्यात घेण्यात आले. काहीना जळगाव तसेच धरणगाव पोलीस स्टेशन येथे बंदिस्त करण्यात आले. शेतकरी वर्ग आपल्या मागण्या रितसर निवेदन देऊन शांततेत करत असतांना
प्रशासनाची दंडेलशाही कितपत योग्य आहे.हे सर्व कोणत्या नेत्याच्या सांगण्या वरून करण्यात आले. हे शेतकरी वर्गास सांगण्याची गरज नाही. ह्या सर्व प्रकारच्या घटनांचा जनतेत प्रचंड असंतोष असून जनता संबधित नेत्याला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सर्वत्र घटनेचा निषेध करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्यात शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव जी वाघसाहेब,उप जिल्हाप्रमुख ॲड शरद माळी,राजूभाऊ ठाकरे,शेतकरी तालुका प्रमुख जयदीप पाटील,उपप्रमुख विजय पाटील,संतोष सोनवणे,नंदू पाटील,गजानन महाजन,विलास पवार,माधव पाटील,संजय पाटील आदि पदाधिकाऱ्यांना अटक करून जळगाव तालुका पोलिसात स्थानबद्ध करण्यात आले.