नोएडा :- देशात रोजगाराचा प्रश्न खुप गंभीर बनत चालला आहे. अनेक सुशिक्षित तरूणांच्या हाती नोकऱ्याच नाही आहेत. त्यामुळे अनेक तरूण नैराश्यातून आयुष्य संपवत आहेत.त्यात आता एका तरूणाने अग्निवीर परिक्षेत नापास झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
केंद्र सरकारने अग्निवीर स्किम लॉंच केली आहे.या स्किम अंतर्गत तरूणांना लष्करात भरती होता येणार आहे. फक्त 4 वर्षच ही नोकरी करता येणार आहे. या नोकरीच्या बदल्यात त्यांना पगार आणि इतर सोयीसुविधा मिळणार आहेत. त्या अंतर्गत आता अग्निवीरांच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेत नापास झाल्याने एका तरूणाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
तणावातून टोकाचं पाऊल
दीपू नावाच्या 19 वर्षीय तरूणाने नुकतीच अग्निवीरची परीक्षा दिली होती. 30 जानेवारीला या परीक्षेचा निकाल लागला होता. या निकालात तो नापास झाला होता. या निकालापासून तो तणावात होता. या तणावातून त्याने राहत्या घरीच आयुष्य संपवलं.या घटनेनंतर तरूणाच्या शेजारी तीन पानी नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्याने हे टोकाचं पाऊल उचलण्याबाबतच कारण लिहलं आहे.

घटनास्थळी नोट सापडली
पोलिसांना घटनास्थळी एक नोट सापडली आहे. या नोटमध्ये लिहलेय की, “मी चार वर्षे खूप मेहनत केली, पण काहीही साध्य झाले नाही. मला माझ्या आई-वडिलांचे नाव रोशन करता आले नाही.या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी मी नक्कीच सैनिक होईन. तसेच दिपू पुढे भावाला उद्देशून लिहतो की, ‘माझे स्वप्न भंगले, आता काय करावे?’ ‘मी सैनिक बनू शकलो नाही, पण तू नक्की बन, आईवडिलांची काळजी घे.

पोलिस काय म्हणाले?
अलीगढचा रहिवासी असलेला 19 वर्षीय दीपू लहान भाऊ अमन आणि मावशीचा मुलगा अंशूसोबत बरौला येथे राहत होता. दीपू आणि त्याचा भाऊ नोएडामध्ये राहून सैन्यात भरती होण्याची तयारी करत होते.मात्र अग्निवीर परीक्षेत दीपू नापास झाला होता. त्यामुळे तो तणावात होता.या तणावातून त्याने टोकाचं पाऊल उचलंल. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे, अशी माहिती नोएडा झोनचे अतिरिक्त डीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी दिली आहे.
दरम्यान ही घटना नोएडा येथील सेक्टर-49 येथील बरौली गावात घडली आहे. तर दीपू हा अलिगढचा रहिवाशी होता. या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






