धरणगाव प्रतिनिधी योगेश पाटील
धरणगाव (प्रतिनिधी) दिव्यांग व्यक्तींना शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेच्या लाभ मिळावा अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तर्फे करण्यात आली.
धरणगाव तालुक्यातील चोरगाव ,कवठळ, पथराड या गावातील दिव्यांग बांधव एकत्र येऊन तहसीलदार नितीन कुमार देवरे व पुरवठा निरीक्षक झोपे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासन निर्णय नुसार 31 डिसेंबर 2021 प्रमाणे दिव्यांग व्यक्तींना पिवळे कार्ड देऊन अंत्योदय योजनेच्या यादी मध्ये समावेश करण्यात यावा, तसेच संबंधित दिव्यांग व्यक्ती यांना दरमहा 35 किलो अन्नधान्य रेशन दुकानावर देण्यात यावे, तसेच दिव्यांग बांधवांना संजय निराधार योजनेचा लाभ मिळावा ,असे विविध समस्या चे निवेदन राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तर्फे तहसीलदार कार्यालयात देण्यात आले.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तर्फे निवेदन देताना शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, अपंग महासंघाचे तालुका अध्यक्ष संजय पाटील (साकरे),महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सरला सोनवणे (चोरगांव) , महेश पाटील (कवठळ),संजय सोनवणे, शानुबाई निकम, रंजना सोनवणे ,इत्यादी दिव्यांग यादव उपस्थित होते.