मुंबई : – सध्या महाराष्ट्रात रेल्वे अपघाताच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच मुंबईत एक मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईतल्या आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या चाकातून अचानक धूर निघू लागल्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी मध्येच लोकल थांबवली आणि खाली उतरले. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.
काय आहे नेमकी घटना?
आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ कसारा-सीएसएमटी लोकलला अचानक आग लागली. लोकलच्या चाकातून धूर निघू लागला. ते पाहून लोकलला आग लागल्याचं समजून डब्ब्यात असलेल्या प्रवाशांनी लोकल ट्रेनमधून उड्या टाकल्या. या सर्व घटनेची माहिती तिथल्या एका प्रवाशाने आसनगाव स्टेशन मास्तरांना दिली. लोकल ट्रेनमधून उड्या घेऊन खाली उतरून कामावर जायला उशीर नको म्हणून प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून पायी चालत आसनगाव स्टेशन गाठलं.
पहा व्हिडिओ :
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतू लोकलमधील चाकांच्या ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. प्रचंड धूर आणि आगीच्या घटनेमुळे ही लोकल आणि डब्ब्यात बसलेल्या प्रवाशांची एकच धावपळ उडाली होती. डब्यातील प्रवाशांनी आपत्कालीन साखळी खेचून गाडी थांबवली. लोकल थांबल्यानंतर प्रवाशांनी लोकलमधून उड्या घेतल्या. प्रवाशांच्या मदतीने चाकाला लागलेल्या छोट्या आगीवर पाणी टाकून ती आटोक्यात आणली. या घटनेमुळे २० मिनिटं गाडी खोळंबळी होती. त्यानंतर ही लोकल कारशेडकडे रवाना झाली.
हे वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……