मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी मराठीतून शपथ घेत पदभार स्वीकारला. ते महाराष्ट्राचे २२वे राज्यपाल झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना राज्यपालपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापुरुषांबद्दल अनेक आक्षेप आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पूर्व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यातून मोठा विरोध झाला होता. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनीही पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला होता. त्यांच्या जागी रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. रमेश बैस है याआधी झारखंडचे राज्यपाल तसेच सात वेळा खासदार राहिले आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपालपदही सांभाळले होते.
रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९७८मध्ये झाली. ते १९७८ मध्ये सर्वात आधी नगरपालिकेत निवडून गेले होते. यानंतर ते १९८० ते १९८४ मध्ये मध्य प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. छत्तीसगढ़ राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा ते खासदार होते. त्यांनी केंद्रातही राज्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यानंतर रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.