सोयगाव दि.१९(साईदास पवार) सोयगांव शहरातील कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेनाभवन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे,
गटनेते अक्षय काळे, नगरसेवक शेख रउफ, भगवान जोहरे, संदीप सुरळकर, लतिफ शहा, अशोक खेडकर, कदीर शहा,राजू दुतोंडे, किशोर मापारी, अक्षय इंगळे,दिलीप देसाई, मोतीराम पंडित, भिका आप्पा, मुकुंद तळेले, विक्रम चौधरी, रमेश गव्हांडे,भगवान वारंगने,अमोल मापारी,मंगेश सोहनी, शेख बबलू, योगेश नागपुरे, प्रसाद पठाडे, संदीप बागले,पुनम परदेशी, सुनिल काळे, भगवान मापारी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……