स्वामी विवेकानंदां वरील साहित्य विक्री रथ आज पासून जळगावात.

Spread the love

महापौर सौ.जयश्री महाजन करणार स्वागत; 20 फेब्रुवारी पर्यंत विविध ठिकाणी दिवसभर उपलब्ध

जळगाव, ता. 1: साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे तसेच पाश्चात्त्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेलेले व्यक्तिमत्त्व व युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे स्व.स्वामी विवेकानंद. जळगावातील श्री रामकृष्ण मिशनचे सर्व भक्त व श्री रामकृष्ण मिशन मठ, पुणे यांच्या वतीने तसेच प्रा.डॉ.रमेश झोपे, श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.श्रीधर इनामदार, श्री.प्रकाश गलवडे यांच्या अनमोल सहकार्यातून स्व.स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ उद्या बुधवार,दि.2 फेब्रुवारी 2022 रोजी जळगावात दाखल होत आहे.

जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन या रथाचे शहरातील काव्यरत्नावली चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास यथोचितपणे स्वागत करून हा सोहळा साजरा करणार आहेत. हा रथ रविवार, दि.20 फेब्रुवारी 2022 पर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्री 8.30 या वेळेत नियोजना प्रमाणे ठरवून दिलेल्या शहरातील भागात उभा असणार आहे.

त्यामुळे जळगावकरांना स्व.स्वामी विवेकानंदांवरील साहित्य खरेदीचा आनंद घेता येणार असल्याने या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे श्री रामकृष्ण मिशनच्या सर्व भक्त परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.

जळगाव शहरात रथ उभा राहण्याची ठिकाणे अशी .


2, 3, 6 व 13 फेब्रुवारी: काव्यरत्नावली चौक, 4 फेब्रुवारी: मू. जे. महाविद्यालय परिसर व रामदास कॉलनी, 5 फेब्रुवारी: गांधी उद्यान, 7 व 8 फेब्रुवारी: स्टेडियमच्या बाजूला, 9 फेब्रुवारी: शिवतीर्थ मैदान, 10 व 11 फेब्रुवारी: सागर पार्क, 12 फेब्रुवारी: नेहरू चौक, 14 व 15 फेब्रुवारी: नवजीवन मेगा मार्ट, मानराज पार्क, 16 व 17 फेब्रुवारी: बजरंग बोगदा, 18 व 19 फेब्रुवारी: एलआयसी ऑफिसजवळ, ख्वाजामियाँ चौक, 20 फेब्रुवारी: डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय.

टीम झुंजार