जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
- मंगळवार 21 फेब्रुवारी रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती सिद्ध नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. मंगळवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
मेष :-
शुभ रंग : पिस्ता| अंक : १
नोकदरांना काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करा कारण जोडीदार आतुरतेने वाट बघत असेल. आनंदी दिवस.
वृषभ :-
शुभ रंग : क्रिम| अंक : ४
काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही डोक्यास ताप देणारी मंडळी भेटू शकतील. मानसिक संतूलन ठेवणे गरजेचे अहे.
मिथुन :-
शुभ रंग : आकाशी | अंक : ७
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज जोडीदार तुमच्यावर खुष असेल.
कर्क :-
शुभ रंग : मोरपिशी | अंक : ५
विरोधक सक्रिय असताना कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. कुणाकडून कसली अपेक्षाच करू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळ येणार नाही.
सिंह :-
शुभ रंग : लाल | अंक : ८
कामाच्या ठीकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांचे समाधान होणे आज शक्य नाही.मानसिक शांतीसाठी सत्संगाकडे पाय वळवाल.
कन्या :-
शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९
कामधंद्याच्या ठीकाणी तुमचे महत्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारून त्या पूर्ण कराल. वरीष्ठांच्या कतुकास पात्र व्हाल. यशदायी दिवस.
तूळ :-
शुभ रंग : राखाडी| अंक : ६
व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल.काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संतती बाबत काही आनंददायी घटना घडतील. छान दिवस.
वृश्चिक :-
शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
कंजूषपणा करून काही उपयोग नाही. असा काही खर्च उद्भवणार आहे की जो टाळणे शक्य नाही. घरातील थोरांचे सल्ले विचारात घेणे गरजेचे आहे.
धनू :-
शुभ रंग : पांढरा | अंक : २
लहरी आणि हट्टी स्वभाव काब्ूत ठेवा. कार्यक्षेत्रात तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. एखद्या प्रसंगी सामंजस्याने मार्ग काढावा लागेल. पत्नीचे ऐका.
मकर :-
शुभ रंग : हिरवा | अंक : ४
तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.
कुंभ :-
शुभ रंग : मोतिया | अंक : ५
ऑफिसच्या कामासाठी प्रवास घडू शकतील. आज काही प्रवासात होणाऱ्या ओळखी भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतील. घराबाहेर वाद संभवतात.
मीन :-
शुभ रंग : तांबडा | अंक : १
आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.शिक्षणाशी निगडीत व्यवसाय तेजीत चालतील. आज कलाकारांना मात्र स्ट्रगल वाढवावी लागणार आहे.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






