निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तांदलवाडी फाटा ते मांगलवाडी दोन कि.मी रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून सदरचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे गड्डे पडले असल्याने खराब रस्त्यामुळे वाहनधारकांमध्ये चकमकी होत असून अपघातांचे प्रमाणही वाढल्याने छोटया मोठया अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
हा परिसर केळीसाठी प्रसिद्ध आहे.केळी भरण्यासाठी मोठया प्रमाणात वाहने येत असतात.रस्त्यावर छोटया तसेच मोठया ट्रॅक्टर, ट्रक अशा अवजड वाहनांची ये जा सुरू असते. गड्डे चुकवितांना अपघात होत असतात.रस्ता आधीच अरुंद असून रस्त्यावर काटेरी झुडपे वाढले आहेत. वाहनधारक तसेच रस्त्याने ये जा करणाऱ्या शेतकरी शेतमजूरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याला साईडपट्टया नसल्यासारख्या असून त्यावर गवत व झुडपे वाढले आहेत वळण रस्त्यावरही मोठी झुडपे व खड्डे असून ते चुकवितांना वाहनधारकांच्या चकमकी होतच असतात.
खराब रस्त्यामुळे एसटी महामंडळाची बसही बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप होत असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






