९ वीत पहिली आलेल्या शिरसाळे येथील१०वीच्या शाळकरी विद्यार्थिनीची परीक्षेपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या.

Spread the love

पप्पा मी पहिलीच येऊन दाखवेन म्हणून रात्रीच सोबत जेवण करतांना सांगितले होते वडिलांना ,

वडिलांनी मुलीचा मृतदेह गळफास अवस्थेत पाहून फोडला टाहो

गौरवकुमार पाटील / अमळनेर

येथून जवळच असलेल्या शिरसाळे बुद्रुक येथील भिका यशवद माध्यमिक विद्यालयात शिकणारी विद्यार्थिनीने गेल्यावर्षी ९ वीत पहिल्या क्रमांकाचे गुण मिळवून पास झालेल्या व आता इयत्ता १० वीत शिकणारी १७ वर्षीय विद्यार्थिनीने मुख्य परीक्षे आधीच स्वतः च्या राहत्या घरी स्लॅबच्या छताला असलेल्या लोखंडी कडीला दोरी बांधून धान्याचा रिकाम्या कोठीवर चढून गळफास घेत आत्महत्या करून परीक्षेपूर्वीच स्वतःची जीवनयात्रा संपवून घेतली , रात्रीच्या जेवणाला आईवडील सोबत पप्पा मी यावेळीही पहिलीच येईन मला चार वाजता अभ्यास करायला लवकर उठवून द्या म्हणून सांगत होती ,

आणि आज दिनांक २२ रोजी पहाटे पाच वाजता वडिल मुलीला अभ्यासासाठी उठवण्यासाठी मुलीच्या खोलीत येऊन पाहतात तर छताला दोरीने गळफास लावून लटकलेली मानसीला पाहून टाहोच फोडला व भुरळ येवून जागीच पडले , इयत्ता ७ वी पासून पहिल्या क्रमांकाचे गुण मिळवणारी मानसीने ९ वीत ही आपली जिद्द कायम ठेवली होती व १० वीच्या पूर्वपरीक्षेतही गणित, इंग्रजी ,सायन्समध्ये वर्गात पहिल्या क्रमांकाची आकडेवारी तिने कायम राखली म्हणून शाळेत १० वीत पहिली येणारी विद्यार्थिनीने मुख्य परीक्षेपूर्वीच आपले जीवन संपविल्याने कुटुंबासह शाळेतील शिक्षक वर्गही निशब्द झाले ,असे मानसीची शाळा असलेल्या भिका यशवद चौधरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बोरसे यांनी दिव्य मराठीकडे सांगितले

याबाबत मारवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरसाळे बुद्रुक येथील विलास प्रकाश चौधरी हे त्यांची पत्नी, लहान मुलगा व मुलगी असा परिवार असून दिनांक २२ रोजी ते मुलगी मानसी विलास चौधरी वय १७ वर्षे हिला पहाटे ४ वाजता अभ्यासासाठी उठवण्यास गेले असता तिने राहत्या घरात पुढच्या रूममध्ये छताच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी गावातील पोलीस पाटील रामचंद्र चौधरी व लोकांना बोलविले.पोलीस पाटील यांनी

मारवड पोलीस ठाण्याचे पीएसआय विनोद पाटील यांना खबरदिल्याने एपीआय जयेश खलाने ,पीएसआय विनोद पाटील , हवालदार भरत इसी घटनास्थळी दाखल झाले , तोवर भरत चौधरी ,प्रदीप चव्हाण , किरण चौधरी यांच्या मदतीने पोलीस पाटील यांनी मानसीला खाली उतरून खाजगी वाहनातून पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ,तेथे डॉक्टरांनी तीस मृत घोषित केले , डॉक्टर जी एम पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविल्यावर गावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिरसाळे बुद्रुक येथील भिका यशवद चौधरी माध्यमिक विद्यालयात मानसी १० वीत शिक्षण घेत होती , ७ वी ते ९ वी पर्यंत पहिल्या क्रमांकाचे गुण ती मिळवून उत्तीर्ण होत असे तिला शिकविणारे शिक्षक व मुख्याध्यापक हेही अंत्ययात्रेत उपस्थित होते , सदर घटनास्थळी पीएसआय विनोद पाटील, हवालदार भरत श्रीराम ईशी यांनी पंचनामा केला पोलीस पाटील रामचंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढील तपास हवालदार भरत ईशी हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार