उत्तराखंडमधील देहरादूनच्या (Dehradun Cant Area) कॅंट भागात एक विचित्र घटना घडली. एका महिलेचा पती घरात नसताना एक तरुण यायचा आणि महिला त्या तरुणासोबत अश्लील बोलायची.याची सर्व माहिती लष्करात सेवेत असलेल्या वडिलांना मुलीने सांगितली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
देहरादून : उत्तराखंडमधील देहरादूनच्या (Dehradun Cant Area) कॅंट भागात एक विचित्र घटना घडली. एका महिलेचा पती घरात नसताना एक तरुण यायचा आणि महिला त्या तरुणासोबत अश्लील बोलायची. याची सर्व माहिती लष्करात सेवेत असलेल्या वडिलांना मुलीने सांगितली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. इतकेच नाही तर या तरूणाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोपही केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, कँट परिसरात ही महिला, तिचा पती, तिची 15 वर्षांची मुलगी आणि 11 वर्षांचा मुलगा असे चौघे राहतात. तिचा पती लष्करी सेवेत आहे. त्याच्या पत्नीची बिहारमधील इस्लाम कॉलनी येथील रहिवासी तनवीर आलम याच्याशी सिंगिंग अॅपच्या माध्यमातून ओळख झाली. जेव्हा या महिलेचा पती कामानिमित्त महाराष्ट्रात गेला होता. त्यावेळी त्याच्या अनुपस्थितीत महिला तनवीरला घरी बोलवायची आणि या दोघांमध्ये अश्लील संवादही होत असे. असे त्यांच्या मुलीने सांगितले. तसेच मुलीने तनवीर आणि तिच्या आईला अनेकवेळा अश्लील कृत्य करतानाही पाहिले होते.

मुलीवर बलात्कार केला
या महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तनवीरने माझ्या पत्नीसोबत कृत्य केले. याची माहिती माझ्या मुलीला असल्याने त्याने माझ्या 15 वर्षांच्या मुलीलाही सोडले नाही आणि तिच्यावरही बलात्कार केला. तसेच धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. मी जेव्हा महाराष्ट्रातून घरी आलो तेव्हा मुलगी घाबरली होती. तिला अधिक विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.

आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल
महिलेच्या पतीने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपी तनवीरचा शोध घेतला जात आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






