VIDEO:नवरदेवास तो हसत हसत लावत होता हळद, अचानक आला हृदयविकाराचा झटका. अन् काय अनर्थ घडले, कॅमेऱ्यात झाले कैद.

Spread the love

हैदराबाद – तुम्ही सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. काही व्हिडिओ तुम्हाला हसवतात तर काही तुम्हाला आश्चर्यचकित करतात. अनेकवेळा आनंदाच्या भरात अशा काही घटना घडतात ज्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. असाच काहीसा प्रकार हैदराबादमध्ये एका लग्न समारंभात घडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हैदराबादच्या काला पत्थर भागात लग्नसोहळा सुरू होता. यादरम्यान अचानक एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

लग्नाचे विधी पार पाडले जात होते. ही व्यक्ती नवरदेवाला हळद लावायला येते आणि काही सेकंदात त्याचा मृत्यू होतो.या सोहळ्यात उपस्थित काही व्यक्तींनी हा हृदयद्रावक प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. आता या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर @MaxMalone1111 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हसत हसत नवरदेवाला हळद लावत होता –
इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार, हृदय पिळवटून टाकणाऱ्या व्हिडिओमध्ये रब्बानी नावाचा एक व्यक्ती नवरदेवाच्या समोर बसलेला दिसत आहे. तो हसत-हसत नवरदेवाला हळद लावत आहे. मग अचानक तो पडतो. यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. या व्यक्तीला उचलण्यासाठी नवरदेवाचीही धावपळ होते. इतर लोकही मदतीला येतात. कुटुंबीयांनी रब्बानी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याआधीही असे अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी अल्मोडा जिल्ह्यातील रानीखेतमध्ये 30 वर्षीय दंतचिकित्सक त्याच्या लग्नाच्या वेळी फेरे मारत असताना पडला होता. त्याचवेळी रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील इंदूरमधूनही समोर आली होती. इथे जिममध्ये व्यायाम करत असताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. ही भीषण घटना जिममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

हे पण वाचा

टीम झुंजार