प्रस्ताविक पुलास श्री संताजी जगनाडे महाराज सेतू नाव देण्यात यावे मनसे चे मुख्याधिकारी यांना निवेदन..

Spread the love

प्रतिनिधी । एरंडोल



एरंडोल :- येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एरंडोल तालुक्याच्यावतीने रंगारी खिडकी ते गांधीपुरास जोडणाऱ्या भव्य उड्डाणपुलास श्री संत संताजी जगनाडे महाराज सेतू असे नाव देण्यात यावे म्हणून तालुका अध्यक्ष विशाल सोनार यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका मुख्याधिकारी व प्रशासक विकास नवाळे यांना निवेदन देण्यात आले.


एरडोल शहरामध्ये नुकतेच रंगारी खिडकी ते गांधीपुरा या नियोजित भव्य उड्डाणपुलाचे भुमिपुजन सोहळा
आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील हे उपस्थित होते. या पुलासाठी गांधीपुरा परिसरातील नागरिकांची अनेक वर्षाची मागणी होती.

एरंडोल येथे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष विशाल सोनार, संदेश महानुभाव गोकुल वाल्डे, मोहन चव्हाण व इतर पदाधिकारी

या नवीन बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे गांधीपुरा परिसरातील नागरिकांना गावात येणे सोपे होणार आहे. सदर ऐतिहासिक पुलाची एरंडोल वासायाची मागणी पूर्ण होत आहे. ज्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. तरी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना एरंडोल अशी मागणी व विनंती करतो की भविष्यात लवकरच निर्माण होणाऱ्या ऐतिहासिक पुलास (रंगारी खिड़की ने गाधीपुरा) संत संताजी जगनाडे महाराज यांचे नांव या पूलास देण्यात यावे. आपला महाराष्ट्र संतांची भुमी म्हणून ओळखला जातो. यापूर्वी आपल्या एरंडोल शहरात अनेक वास्तुना संताची नावे देण्यात आली सदर बाब अभिमानाची आहे.

तरी वरील प्रमाणे नियोजित पुलास श्री संत संताजी जगनाडे महाराज असे नामकरण करण्यात यावे असे मनसे देण्यात आलेल्या निवेदनावर म्हटले आहे.
या निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष विषाल सोनार, शहराध्यक्ष संदेश महानुभाव, मानवधिकार सरचिटणीस मोहन चव्हाण, तालुका सरचिटणीस सुहास महाजन, शहर उपाध्यक्ष गोकुल वाल्डे, जिल्हा उपाध्यक्ष ग्यानू पाटील, गणेश जाधव, अनिल पाथरवट, गुलाब भोई, हर्षल पाटील, सुभाष पाटील, भारत सोनवणे, किर्तेश पाटील ज्ञानेश्वर पाटील, नंदलाल चौधरी, राजेंद्र सोनवणे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टीम झुंजार